BIS Hallmark: सोन्यासाठी ‘हॉल मार्क’सह ‘एचयूआयडी कोड’ गरजेचा

१ जूनपासून सोने हे हॉल मार्क असल्याशिवाय विक्री करु नये असा नियम करण्यात आला
gold
goldgold

औरंगाबाद: सोने-चांदीवर आता हॉलमार्क सक्तीचे कारण्यात आले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत जुने सोनेही हॉल मार्क करण्यासाठीची मुदत देण्यात आली आहे. यामुळे शहरातील दोन हॉल मार्क सेंटरवर सोने हॉल मार्क करुन घेण्यासाठी वेटिंग येत आहे. यासह आता वार्षिक ४० लाखावर उलाढाल असलेल्या सराफा व्यवसायिकांना हॉल मार्क बरोबर एचयुआयडी(HUID) कोड करणेही सक्तीचे करण्यात आले आहे. या कोडमुळे कोणत्या सराफा व्यवसायिकांकडून आपण सोने खरेदी केली आहे, ते कळणार आहे. मात्र, याची प्रक्रिया किचकट असल्याने सराफा व्यावसायिकांपुढील अडचणी वाढल्या असल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले.

ता. १ जूनपासून सोने हे हॉल मार्क असल्याशिवाय विक्री करु नये असा नियम करण्यात आला. १६ जूनपासून यांची अमंलबाजवणी सुरु करण्यात आली आहे. यात हॉलमार्क सक्तीचे केले असले तरी, शहरात केवळ दोन हॉल मार्क सेंटर आहेत. यामुळे हॉल मार्क करण्यासाठी वेटिंग आहे. हॉल मार्कसह एचयुआयडी कोडची सक्ती आल्यामुळे चाळीस लाखावर उलाढाल असलेल्या सराफा व्यवसायिकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या कोडमुळे दुकानात जेवढा माल आहे, त्यांची नोंदी हॉल मार्क सेंटरवर राहणार आहे. हॉल मार्कमुळे सोन्याची शुध्दता राहिल. हे ग्राहकांच्या फायद्याचे रहाणार आहे. हॉल मार्कमुळे मजुरीचा खर्च वाढेल. तो ग्राहकांना खरेदी करताना द्यावा लगाणार आहे. जुने सोने हॉल मार्क करुन देण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावीत अशी मागणीही राजेंद्र मंडलिक यांनी केली.

gold
उच्च न्यायालयाने ओढले महसूल राज्यमंत्र्यांवर ताशेरे

शहराला चार हॉल मार्क सेंटरची गरज
जिल्ह्यासाठी केवळ दोनच हॉल मार्क सेंटर आहेत. यामुळे अनेक महिन्यापासून वेटिंग आहे. शहासाठी किमान चार हॉल मार्क सेंटरची गरज आहे. शहरात छोटा असो वा मोठा सर्वांना सोने हॉल मार्क करायचे असेल तर याच सेंटरवर जावे लागते. हॉल मार्क सक्तीचे असल्याने ग्राहकांकडुन आलेली ऑर्डर देण्यासाठी आता दोन ते तीन दिवस उशीर लागणार आहे. मात्र, यामुळे ग्राहकांना शुध्द सोने मिळेल, असे सराफा व्यावसायिक उदय सोनी यांनी सांगितले.

हॉलमार्क आणि चाळीस लाख वार्षिक उलाढाल असेल्यांना एचयुआयडी कोड सक्तीचा करण्यात आला आहे. सध्या छोटे सराफा व्यवसायिक संभ्रमात आहे. याविषयी दोन दिवसांपूर्वी बैठकही झाली आहे. सध्या व्यापारी संभ्रमावस्थेत आहे.
-संदीप मैड, सराफा व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com