Today Gold Rate : सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ! काय आहे आजचा दर

सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
gold rates today
gold rates today
Summary

सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

तुम्हाला सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold jewelry) खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडे सोन्या-चांदीचे (Gold Silver) दागिने स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी आहे. या व्यापारी आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी सोन्याच्या भावात (Gold Rate) किंचित वाढ झाली. शुक्रवारी सोने प्रति दहा ग्रॅम 104 रुपयांनी महागून 48135 रुपयांवर बंद झाले. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी सोने 48031 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदीचा भाव (Silver Rate) 106 रुपयांनी वाढून 61859 रुपये प्रति किलोवर बंद झाला. याआधी गुरुवारी चांदी 61753 प्रतिकिलोच्या दराने बंद झाली होती.

gold rates today
गृहोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार; जाणून घ्या काय आहेत कारणं?

14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीन किंमत

शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा नवीन भाव 48135 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोन्याचा दर 47942 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर 44092 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याचा भाव 36101 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि सोने 28159 रुपये प्रति 10 ग्रॅम पातळीवर व्यवहार करत आहे.

मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे सोन्याची नवीन किंमत (The new price of gold) जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासह, वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी तुम्ही www.Ibja.Co ला भेट देऊ शकता.

gold rates today
नववर्षात महागाईचा झटका! कारपासून खाद्यतेलाच्या वाढणार किंमती

हॉलमार्क (Hallmark) पाहूनच सोने खरेदी करा

सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवा. हॉलमार्क (Hallmark)पाहूनच सोन्याचे दागिने (Gold jewelry) खरेदी करावेत. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS)ही भारतातील एकमेव एजन्सी आहे, जी हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com