Gold silver Rates :दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा वाढ 

gold
gold

Gold price today: बुधवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळाली. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर जवळपास सोने 204 रुपयांच्या तेजीसह 47 हजार 955 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवसाय करत आहे. दुसरीकडे चांदी 790 रुपयांच्या तेजीसह 68 हजार 300 रुपये प्रति किलोवर व्यवसाय करत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये सोने-चांदीवरील इम्पोर्ट ड्यूटी कमी करण्यासाठी प्रस्ताव आणणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती.  

दिल्लीमध्ये सोन्याचे भाव

Gold Price Today in delhi  जागतिक स्तरावर सोन्याच्या दरांमध्ये घसरण होत असताना मंगळवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 480 रुपयांनी घसरुन 47 हजार 702 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले होते. एचडीएफसी सिक्योरिटीजने याची माहिती दिली होती. याआधी सोमवारी सोन्याचे दर 48 हजार 182 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी चांदी 3 हजार 097 रुपयांनी घसरुन 70 हजार 122 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली होती. त्यानंतर बुधवारी सोने-चांदीच्या दरात किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 847 डॉलर प्रति औंस घट पाहायला मिळाली. चांदी 27.5 डॉलर प्रति औंसने घसरले. एचडीएफसी सिक्टोरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितलं की, अमेरिकेत अजूनही कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती सुधारलेली नाही. शिवाय बायडेन यांनी यासाठी पॅकेज अद्याप जाहीर केलं नाही. त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये घसरण होत आहे. गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांच्या नफा वसुलीमुळेही दबाव आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com