Gold-Silver Price: सोन्याच्या दरानं गाठला आठवडाभराचा उच्चांक; जाणून घ्या आजचे दर

अमेरिका आणि जागतिक बाजारपेठेतील चलनवाढीच्या चिंतेमुळे, तसेच डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरात वाढत होत आहे.
Check Today's Gold Silver Price Updates
Check Today's Gold Silver Price UpdatesSakal

Gold-Silver Price Today: अमेरिका आणि जागतिक बाजारपेठेतील चलनवाढीच्या चिंतेमुळे, तसेच डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरात वाढत होत आहे. गेल्या आठवड्यात सराफा बाजारात प्रचंड अस्थिरतेनंतर सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातीलाही सोन्याच्या दर 150 रुपयांनी वाढून 52,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. कॅमेक्सवर, सोने 13 डॉलरने वाढून 1858 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. कमी भावात तुरळक खरेदी-विक्री झाल्याने चांदीच्या दरातही वाढ झाली. चांदीचा भाव 200 रुपयांनी वाढून 63,300 रुपये किलो झाला.

Check Today's Gold Silver Price Updates
Gold-Silver Price: सोन्या-चांदीचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजची किंमत

सोने खरेदी करण्याची योग्य वेळ-

सोन्याचा दर 50 ते 52 हजार रुपयांपर्यंत असेल तर दागिन्यांची खरेदी करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता प्रतीक्षा करणे योग्य नाही. येत्या काळात बाजारात दागिन्यांचाही तुटवडा जाणवू शकतो.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Check Today's Gold Silver Price Updates
Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजची किंमत

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com