Gold Rate: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold rate

Gold Rate: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. बुधवारी सोने चांदीच्या दरात कोणताही बदल दिसून आला नाही. सर्व दर स्थिर होते मात्र आज गुरुवारी सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 50,300 तर 24 कॅरेट साठी 54,880 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 710 रुपये आहे. (gold silver price update 15 December 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 55,640 रुपये

  • दिल्ली - 55,040 रुपये

  • हैदराबाद - 54,880 रुपये

  • कोलकत्ता - 54,880 रुपये

  • लखनऊ -55,040 रुपये

  • मुंबई - 54,880 रुपये

  • नागपूर - 54,880 रुपये

  • पुणे - 54,880 रुपये

हेही वाचा: Share Market : दिवाळखोर कंपनीची खरेदी ठरली खरेदीदारांच्या शेअर्समधील घसरणीचे कारण

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हेही वाचा: Stock Market : या स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, अडीच वर्षात तिप्पट परतावा...

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.