खरेदीकरांसाठी सुवर्ण काळ! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर | Gold Silver Price | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold rates

खरेदीकरांसाठी सुवर्ण काळ! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात प्रचंड घसरण दिसून येत आहे. आजही सोन्याचे भाव घसरले असून चांदीचे दर मात्र स्थिर आहे. त्यामुळे सोने खरेदीकरांसाठी हा उत्तम काळ मानला जातोय.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,020 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 567 रुपये आहे. (gold silver price update 20 september 2022)

हेही वाचा: Gold-Silver Price: पितृपक्षात सोनं स्वस्त! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 50,530 रुपये

दिल्ली - 50,170 रुपये

हैदराबाद - 50,020 रुपये

कोलकत्ता - 50,020 रुपये

लखनऊ - 50,170 रुपये

मुंबई - 50,020 रुपये

नागपूर - 50,050 रुपये

पूणे - 50,050 रुपये

हेही वाचा: Gold-silver Price: सोन्याचे भाव स्थिर तर चांदीच्या दरात तेजी कायम, जाणून घ्या आजचे नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हेही वाचा: Gold-silver Price: सोन्याचा भाव स्थिर तर चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Web Title: Gold Silver Price Update 20 September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..