Gold Rate : वीकेंड जवळ येताच सोने चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Silver Rate

Gold Rate : वीकेंड जवळ येताच सोने चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत होती. गुरुवारलाही सोने चांदीच्या दरात घसरण दिसली मात्र वीकेंड जवळ असल्याने आज सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,550 तर 24 कॅरेट साठी 52,970 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 622 रुपये आहे. (gold silver price update 25 November 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 53,780 रुपये

  • दिल्ली - 53,120 रुपये

  • हैदराबाद - 52,970 रुपये

  • कोलकत्ता - 52,970 रुपये

  • लखनऊ - 53,120 रुपये

  • मुंबई - 52,970 रुपये

  • नागपूर - 52,970 रुपये

  • पुणे - 52,970 रुपये

हेही वाचा: Stock Split : दोन वर्षात 200% रिटर्न, 'या' कंपनीने केली शेअर्स स्टॉक स्प्लिटची घोषणा

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात