खरेदीची सुवर्णसंधी, सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण

आज सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे.
Today's Gold, Silver Price Updates
Today's Gold, Silver Price Updatesesakal

गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी्च्या दरात चढ उतार दिसून येत आहे. सध्या लग्नसराई संपत आल्याने सोन्याचे भावातही घसरण झाली आहे. आज सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. या घसरणीनंतर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47500 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,820 रुपये आहे तर चांदीच्या दरातही थोडी घसरण झाली असून 10 ग्रॅम चांदीचा दर आज 606 रूपये आहे.(Today's Gold, Silver Price Updates)

बुधवारलाही सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली होती. 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,740 रुपये तर 24 कॅरेट साठी ₹ 52,090 रुपये होती तर चांदीच्या दरातही थोडी घसरण होत 10 ग्रॅम चांदीचा दर 612 रूपये होता. (gold silver rate todays update 2 june 2022)

Today's Gold, Silver Price Updates
जीएसटी संकलनात मेमध्ये ४४ टक्के वाढ

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 51,700 रुपये

दिल्ली - 51,810 रुपये

हैदराबाद - 51,810 रुपये

कोलकत्ता - 51,810 रुपये

लखनऊ - 51,960 रुपये

मुंबई - 51,810 रुपये

नागपूर - 52,860 रुपये

पूणे - 52,860 रुपये

Today's Gold, Silver Price Updates
शेअर बाजार सुरु होण्यापुर्वी जाणून घेऊयात आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Today's Gold, Silver Price Updates
पंचांग 2 जून: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com