Gold Silver Price : सोने-चांदी दरात चढ-उतार; आजचा दर काय?

Gold
Gold

Gold Silver Price : कोरोना व्हायरसमुळं जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. भारताबरोबरच जगभरात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. जगभरातील शेअर बाजारांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहेत. दुसरीकडं सोने आणि चांदीच्या दरात मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घसरण सुरू आहे. गेल्या महिन्यात उच्चांकी पातळीवर असलेलं सोने आणि चांदी आता, घसरू लागलंय.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईत आज काय दर?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरांवर होतो. गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली. सोनं प्रति तोळा 485 रुपयांनी स्वस्त झालं तर चांदीच्या दरात प्रति किलो 2 हजार 81 रुपयांची घसरण झाली. चांदी 58 हजार रुपये किलो दराने विकली जात होती. तर सोनं, 50 हजार 418 रुपये प्रति तोळा दरानं विक्री होत होतं.

गेल्या जवळपास दीड महिन्यांनंतर चांदी 60 हजार रुपये किलोच्या खाली विकली जात होती. आज, शुक्रवार (25 सप्टेंबर) मुंबईच्या बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 48 हजार 410 तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार 410 रुपये होता. चांदीचा मुंबईतील आजचा दर, 50 हजार 700 रुपये किलो होता.

कालच्या मुंबईतील दराच्या तुलनेत यात 700 रुपयांची वाढ झाल्याची माहिती गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिली आहे. तर, 22 कॅरेट सोनं 48 हजार 410 रुपये दराने विक्री होत आहे. काल त्याचा दर 48 हजार 400 रुपये होता, असं गुड रिटर्न्सच्या वेबसाईटवर सांगण्यात आलंय.

पुन्हा उसळी घेणार?
शेअर बाजारातील चढ उतार आणि गुंतवणुकीतील व्याज दर यांचा परिणाम सोन्या चांदीच्या दरांवर होत असतो. विकसनशील देशांमध्ये मात्र व्याज दर शून्य टक्क्यांवर गेले आहेत. त्यामुळं भविष्यात गुंतवणूकदार सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक करतील, अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळं सोन्याचे दर घसरत असले तरी, ते पुन्हा उसळी घेतली, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी डॉलर आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत झाला आहे. अमेरिकेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या घडामोडींचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही होत असल्याचं दिसत आहे. परिणामी गुंतवणूकदारांचं लक्ष सोने-चांदीच्या दरांकडं लागलंय.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com