
भारतातील ई कॉमर्स व्यवसायाची दरवर्षी २७ टक्क्यांनी वाढ होऊन २०२४ पर्यंत या क्षेत्रातील उलाढाल ९९ अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज ‘गोल्डमन सॅक्स’ने वर्तविला आहे. तसेच, या क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजची मक्तेदारी निर्माण होऊन ते फेसबुकच्या साह्याने ऑनलाइन किराणा माल व्यवसायात निम्मा वाटा त्यांचा असेल, असेही या संस्थेने म्हटले आहे.
नवी दिल्ली - भारतातील ई कॉमर्स व्यवसायाची दरवर्षी २७ टक्क्यांनी वाढ होऊन २०२४ पर्यंत या क्षेत्रातील उलाढाल ९९ अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज ‘गोल्डमन सॅक्स’ने वर्तविला आहे. तसेच, या क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजची मक्तेदारी निर्माण होऊन ते फेसबुकच्या साह्याने ऑनलाइन किराणा माल व्यवसायात निम्मा वाटा त्यांचा असेल, असेही या संस्थेने म्हटले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनामुळे ई कॉमर्सची चांगलीच भरभराट झाली असून अनेक नवे ग्राहक निर्माण झाले आहेत. लॉकडाउनमुळे अनेकांनी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिल्याने तीन वर्षांत अपेक्षित असलेली वाढ तीनच महिन्यात साधली गेली आहे. यामुळे २७ टक्के इतक्या प्रचंड वेगाने वाढ होऊन २०२४ पर्यंत एकूण उलाढाल ९९ अब्ज डॉलरपर्यंत वाढेल आणि यामध्ये किराणा माल आणि फॅशनेबल वस्तू यांचा मोठा वाटा असेल, असे ‘गोल्डमन सॅक्स’ने म्हटले आहे.
रिलायन्स- व्हॉट्सॲप भागीदारी
रिलायन्सने ऑनलाइन किराणा विक्रीसाठी फेसबुकबरोबर भागीदारी केली आहे. फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्म्स या रिलायन्सच्या कंपनीतील ९.९९ टक्के समभाग खरेदी केले आहेत. फेसबुकच्या व्हॉट्सॲपद्वारे स्थानिक किराणा दुकानदारांशी जोडून व्यवसाय वाढविण्याचा रिलायन्सच्या ‘जिओ मार्ट’चा विचार आहे. सध्या ऑनलाइन किराणा व्यवसायात ८० टक्के वाटा बिग बास्केट आणि ग्राफर्स या कंपन्यांचा आहे.
अहवालातील वास्तव आणि अंदाज
या वस्तूंच्या ऑनलाइन खरेदीला प्राधान्य
किराणा, फॅशनेबल वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आरोग्य सुविधा उपकरणे.
६० टक्के - भारतातील एकूण ऑनलाइन खरेदीत किराणा मालाचा वाटा
३ लाख - दररोजची ऑनलाइन नोंदणी (२०१९)
५० लाख - दररोजची ऑनलाइन नोंदणी (२०२४ मधील अंदाज)
Edited By - Prashant Patil