'सीबीईसी'कडून सेवाकर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

"सीबीईसी'ने दिलेल्या अधिसूचनेनुसार, फॉर्म एसटी-3 सादर करण्याची तारीख वाढविली आहे. विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाने (सीबीईसी) सेवाकर परतावा भरण्याची मुदत 30 एप्रिल 2017 पर्यंत वाढविली आहे. ऑक्‍टोबर 2016 ते 31 मार्च 2017 पर्यंतच्या कालावधीसाठीचा सेवाकर परतावा भरण्याची तारीख आता 25 एप्रिलएवजी 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

"सीबीईसी'ने दिलेल्या अधिसूचनेनुसार, फॉर्म एसटी-3 सादर करण्याची तारीख वाढविली आहे. विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

एसीईएसच्या संकेतस्थळावर 25 एप्रिल रोजी सेवाकर परतावा भरताना अडचणी आल्याने मुदत 30 एप्रिल 2017 पर्यंत वाढविली असल्याचे "सीबीईसी'कडून सांगण्यात आले. 
वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असल्याने अप्रत्यक्ष करांबाबत धोरण ठरविणाऱ्या केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाचे (सीबीईसी) नामकरण आता केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) असे करण्यात येणार आहे. 

Web Title: Goods and Services Tax: CBEC sanctions fund to educate taxpayers