महारथी ‘आयटी’तील

महारथी ‘आयटी’तील

या   ‘वित्त’रूपी नभमंडळात ‘शेअर मार्केट’ नावाचा ‘चंद्र’ भरदिवसा तळपत असतो. त्याचे अनेक ‘उपग्रह’ त्याच्या भोवती पिंगा घालत असतात. मात्र, ही सर्व हालचाल पृथ्वीवरून मर्त्य माणूस करत असतो. अशा या काही महत्त्वाच्या महारथी ग्रहांचा हा अभ्यास त्यांची ‘कुंडली’ मांडून करता येतो.

नुकतेच पहिल्या चार कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल उत्तम लागले आहेत. वार्षिक उत्पन्न वाढ ‘टीसीएस’मध्ये ०.४ टक्के, ‘इन्फोसिस’ ६.६ टक्के, ‘विप्रो’ (-) २ टक्के झाली आहे, तर ऑपरेटिंग मार्जिन वाढ ‘टीसीएस’मध्ये २६.६ टक्के, ‘इन्फोसिस’ २५.४ टक्के, ‘एचसीएल टेकमध्ये २२.९ टक्के आणि ‘विप्रो’मध्ये २१.७ टक्के झाली आहे. ‘विप्रो’ला मागे टाकून ‘एचसीएल टेक’ने आता तिसरा क्रमांक पटकाविला आहे. पुढच्या तिमाहीत एकूण उत्पन्न २ ते ३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे.

ओळखा कोणता शेअर चांगला?
याशिवाय या क्षेत्रात कोफोर्ज, माइंडट्री, एलअँडटी इन्फो, पर्सिस्टंट, ओरॅकल, एम्फसिस, मास्टेक, झेन आदी कंपन्याही चांगले काम करीत आहेत. ‘टीसीएस’ आणि ‘विप्रो’ची ‘बायबॅक ऑफर’ संपली आहे. मात्र, ‘बायबॅक’पेक्षा बाजारभाव जास्त आहेत. थोडक्यात, गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आणि उत्तम शेअर म्हणून ‘विप्रो’ बरा वाटतो.

(डिस्क्लेमर ः लेखक शेअर बाजाराचे अनुभवी जाणकार आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व्यक्त केले आहे. मात्र, शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com