esakal | सरकारी बॅंका येणार तुमच्या दारी!
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारी बॅंका येणार तुमच्या दारी!

येत्या ऑक्‍टोबरपासून सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बॅंका घरपोच बॅंकिंग सेवा द्यायला सुरुवात करणार आहेत. यामध्ये स्टेट बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र आदी १२ बॅंकांचा समावेश असणार आहे.

सरकारी बॅंका येणार तुमच्या दारी!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘कोविड-१९’मुळे बॅंकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन आपले व्यवहार पूर्ण करणे अनेकांसाठी कठीण जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन येत्या ऑक्‍टोबरपासून सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बॅंका घरपोच बॅंकिंग सेवा द्यायला सुरुवात करणार आहेत. यामध्ये स्टेट बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र आदी १२ बॅंकांचा समावेश असणार आहे. सुरुवातीला शंभर शहरांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. खासगी बॅंकांच्या वाढत्या स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी बॅंकांचे हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुविधेचा लाभ कोणाला घेता येणार?
ज्येष्ठ नागरिक, लष्करातील जवान, विधवा, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी, पगारदार कर्मचारी, छोटे विक्रेते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुविधा कशी काम करणार?
    खातेधारकांना बॅंकेच्या ॲप, वेबसाइट किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा लागणार. 
    या माध्यमातून कोणती सुविधा हवी आहे, याची माहिती द्यावी लागेल.
    याबद्दलचा मेसेज बॅंक तसेच सर्व्हिस एजंटला दिला जाणार.
    नंतर तुमच्या घरी कागदपत्रे न्यायला किंवा द्यायला एक व्यक्ती येणार. 
    या सुविधेसाठी एक स्वतंत्र कंपनी स्थापण्याचा विचार सुरू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपर्क साधण्याची माध्यमे
    डोअरस्टेप नावाचे मोबाईल ॲप वापरू शकता. 
    www.psbdsb.in या संकेतस्थळाचा वापर करू शकता.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा