जीएसटी वसुलीमध्ये वाढ झाल्याने सरकारला दिलासा 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 2 July 2020

कोविड १९ संकट आणि लॉकडाउनमुळे महसूल लक्षणीय प्रमाणात घटला आहे. लॉकडाउनच्या अंमलबजावणीमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने एप्रिलमध्ये फक्त ३२,२९४ कोटी रुपये जीएसटी वसुल झाला होता.

नवी दिल्ली - लॉकडाउननंतर अर्थव्यवस्थेचा गाडा हळुहळू रुळावर येऊ लागला असून मागील महिन्यात ९०,९१७ कोटी रुपये ‘जीएसटी’ची (वस्तू आणि सेवा कर) वसुली झाली आहे. एप्रिल आणि मे मधील कोलमडलेला महसूल पाहता जूनच्या आकडेवारीने सरकारला हायसे वाटले आहे. 

कोविड १९ संकट आणि लॉकडाउनमुळे महसूल लक्षणीय प्रमाणात घटला आहे. लॉकडाउनच्या अंमलबजावणीमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने एप्रिलमध्ये फक्त ३२,२९४ कोटी रुपये जीएसटी वसुल झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची वसुली फक्त २८ टक्के होती. मे मध्ये काही प्रमाणात वसुलीत वाढ होऊन रक्कम ६२,००९ कोटी रुपये झाली. हे प्रमाण मागील वर्षाच्या जीएसटी वसुलीच्या तुलनेत ६२ टक्के होते. आता जीएसटी विवरणपत्र भरण्यात आणि कर भरण्यात सूट दिली त्यानंतर जूनमध्ये बऱ्यापैकी कर वसुली वाढली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के आहे. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीएसटी वसुलीचे प्रमाण ५९ टक्के असले तरी मे महिन्याचा जीएसटी भरण्यासाठी वाढीव मुदत दिल्याने एकत्रित वसुली आणखी वाढण्याची सरकारला अपेक्षा आहे. सरकारने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे जीएसटी विवरणपत्र जून महिन्यात सादर करण्यास परवानगी दिली होती. तर मे चीही काही विवरणपत्रे जुलैमध्ये भरण्यास संमती देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

जूनमध्ये झालेल्या ९०,१९७ कोटी जीएसटी वसुलीत रकमेत केंद्रीय जीएसटीचा (सीजीएसटी) वाटा १८,९८० कोटी रुपयांचा तर राज्य जीएसटीचा (एसजीएसटी) वाटा २३,९७० कोटी रुपयांचा आहे. त्यासोबतच आयजीएसटी म्हणजे एकत्रित जीएसटीचा हिस्सा यामध्ये ४०,३०२ कोटी रुपयांचा आहे. यात १५,७०९ कोटी रुपये आयात वस्तूंवरील करातून वसुल करण्यात आले. दरम्यान, सरकारला उपकरापोटी ७,६६५ कोटी रुपये मिळाले आहेत. सरकारने सीजीएसटीचे १३,३२५ कोटीचे तर एसजीएसटी आणि आयजीएसटीचे ११,११७ कोटी रुपयांचे दावे निकाली काढले आहेत. त्यामुळे सर्व दावे निकाली काढल्यानंतर केंद्र आणि राज्यांना जून २०२० मध्ये सीजीएसटीपोटी ३२,३०५ कोटी आणि एसजीएसटीपोटी ३५,०८७ कोटी रुपये मिळाले. यात आयातीवरील करवसुलीपोटी ७१ टक्के तर देशांतर्गत व्यवहारांपोटीची करवसुली ९७ टक्के आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जीएसटी वसुली- 
एप्रिल २०१९-२० मध्ये - १,१३८६६ कोटी 
एप्रिल २०२०-२१ मध्ये - ३२२९४ कोटी 

मे २०१९-२० मध्ये - १,००२८९ कोटी 
मे २०२०-२१ मध्ये - ६२००९ कोटी 

जून २०१९-२० मध्ये - ९९९४० कोटी 
जून २०२०-२१ मध्ये - ९०९१७ कोटी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government relieved by increase in GST collection

Tags
टॉपिकस
Topic Tags: