मोदी सरकार आता 'ही' मालमत्ता विकून उभारणार पैसा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने 'एनीमी शेअर'बाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या नागरिकांच्या मालमत्ता  सरकारजमा आहेत. अशा मालमत्तेला 'एनीमी शेअर' संबोधले जाते. केंद्र सरकारने आता अशा मालमत्ता विकण्याच्या प्रक्रियेला मंजुरी दिली आहे.  देशातील सुमारे 3 हजार कोटी रुपयांची संपत्ती विकण्याचा प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली 

देशातील 'एनीमी शेअर' अशा मालमत्ता गेल्या कित्येक वर्षांपासून विनावापर पडून आहेत. त्यामुळे या विनावापर असलेल्या विकण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता अनेक वर्षांपासून विनावापर पडून राहिलेल्या मालमत्ता आता विकता येणार आहेत. यातून मिळालेला पैसे कल्याणकारी योजनांवर खर्च केले जाणार आल्याचेही त्यांनी सांगितले.  

कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडियाकडे सध्या 20 हजार 323 शेअरधारकांच्या 996 कंपन्यांमध्ये एकूण 6 कोटी 50 लाख, 75 हजार 877 शेअर्स आहेत. त्यातील 588 कंपन्या सक्रिय असून 139 कंपन्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt approves mechanism for sale of enemy shares worth Rs 3000 cr