जीएसटी रिटर्न फायलिंगची 'ही' असेल नवीन अंतिम तारीख

GST annual return
GST annual returneskal

भारत सरकारने 2020 - 21 या आर्थिक वर्षातील जीएसटी रिटर्न्स फायलिंगची (GST annual return) अंतिम तारीख दोन महिन्यांनी वाढवून दिली आहे. आता 28 फेब्रुवारी पर्यंत जीएसटी रिटर्न्स फायलिंग करता येणार आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर बोर्डाने बुधवारी रात्री उशिरा ट्विट करुन महिती दिली की '2020 - 21 या आर्थिक वार्षाचे रिटर्न्स सेल्फ सर्टिफाईड रिकॉन्सिलेशन स्टेटमेंट आणि फॉर्म जीएसटीआर - 9 (GSTR - 9) भरण्याची तारीख 31 - 12 2021 ही होती आता ती 28 - 02 - 2022 पर्यंत वाढवली आहे.

GST annual return
Big Scam : शेअर बाजारातील ५ मोठे घोटोळे, कोट्यावधींची अफरातफर

जे करदाते जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत आहेत त्यांना वर्षाला जीएसटीआर 9 हे वार्षिक रिटर्न फाईल करावे लागते. हे वार्षिक रिटर्न्स ज्या करदात्यांची वार्षिक उलाढाल ही 2 कोटी रुपयांच्या वर आहे त्यांना भरणे बंधानकारक असते. तर रिकॉन्सिलेशन स्टेटमेंट (reconciliation statement) हे ज्यांची वार्षिक उलाढाल ही 5 कोटी रुपयांच्या वर आहे त्यांनी भरायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com