केंद्र सरकारकडून ‘एसबीआय’मध्ये रु.5,681 कोटींची गुंतवणूक

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) केंद्र सरकारला प्रिफरन्शिअल शेअर्सची विक्री करुन 5,680.99 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. बँकेच्या भांडवली उभारणीसंदर्भातील संचालकांच्या समितीने केंद्राला प्रिफरन्शिअल तत्त्वावर 21.07 कोटी शेअर्सचे वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी प्रतिशेअर 269.59 रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली आहे. बँकेच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य एक रुपया आहे.

बँकेला चालू आर्थिक वर्षासाठी 7,575 कोटी रुपयांचे भांडवल पुरविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ही शेअरवाटप प्रक्रिया त्याचाच भाग आहे. बँकेला ऊर्वरित 25 टक्के भांडवल 31 मार्चपर्यंत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Govt to infuse Rs 1,894 crore capital into State Bank of India