कॅशलेस व्यवहारांसाठी या आहेत नव्या योजना

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदी सरकारने आज (गुरुवारी) काही मोठ्या घोषणा केल्या. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

अर्थमंत्री अरुण जेटलींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :

 • डिजिटल पद्धतीने (कॅशलेस) पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणार्‍यांना 0.75 टक्के सवलत.
 • डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्याचे मोदी सरकारचे धोरण
 • मोदी सरकार 4 कोटी 32 लाख शेतकऱ्यांना रुपे कार्ड देणार
 • सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचे सामान्य विमा 10 टक्के सवलत (प्रीमियमवर)
 • सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचे जीवन विमा 08 टक्के सवलत (प्रिमियमवर)
 • राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर डिजिटल पेमेंट केल्यास थेट 10 टक्के सूट
 • रेल्वेच्या ऑनलाइन तिकिटावर 10 लाखांचा विमा
 • उपनगरी रेल्वेचे डिजिटल मासिक पास घेतल्यास 0.5 टक्के सूट
 • रेल्वे तिकीट ऑनलाईन पद्धतीने आरक्षित केल्यास 5 टक्क्यांची सूट :
 • उपनगरी रेल्वेचे डिजिटल मासिक पास घेतल्यास 0.5 टक्के सूट, मुंबईपासून यांची सुरुवात करण्यात येणार असून 1 जानेवारीपासून लागू होणार.
 • दहा हजार लोकसंख्या असलेल्या खेड्यात दोन मोफत POS मशीन मिळणार
   
Web Title: govt launches new schemes to promote cashless transactions