ग्रॅन्युल्स इंडियाचा शेअर 3 टक्के तेजीत का?

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई: ग्रॅन्युल्स इंडियाच्या प्रवर्तकांनी कंपनीतील हिस्सेदारीचे प्रमाण वाढविल्यानंतर आज(सोमवार) कंपनीचा शेअर इंट्राडे व्यवहारात 3 टक्क्यांनी वधारला आहे. ग्रॅन्युल्सची प्रवर्तक कंपनी 'टाइच टेक'ने इक्विटी शेअर्सचे वॉरंट्समध्ये रुपांतर करीत कंपनीतील हिस्सेदारी 11.75 टक्क्यांवर नेली आहे. या घोषणेनंतर, ग्रॅन्युल्स इंडियाच्या शेअरमध्ये तेजी निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यात, जागतिक बँकेची उपकंपनी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने(आयएफसी)  ग्रॅन्युल्सला 47.5 दशलक्ष डॉलरचे (रु. 318 कोटी) अर्थसाह्य करण्याची घोषणा केली होती.

मुंबई शेअर बाजारात ग्रॅन्युल्स इंडियाचा शेअर 129.95 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 129.80 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 133 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(12 वाजून 12 मिनिटे) कंपनीचा शेअर 131.90 रुपयांवर व्यवहार करत असून 2.53 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: Granules India rises 3% on stake increase by promoter