
Gratuity Formula : ग्रॅच्युइटी रक्कम ठरवताना वापरला जातो हा फॉर्म्युला? ? नोकरी सोडण्यापूर्वी तुम्हाला किती पैसे मिळतील
Gratuity Formula : तुम्ही अनेक वर्ष प्रमाणिकपणे नोकरी करता. त्याबदल्यात तुम्हाला महिन्याला पगार मिळतोच. पण, त्याचबरोबर नोकरी सोडताना तुम्हाला एक ठराविक रक्कम दिली जाते. त्याला ग्रॅच्युइटी असे म्हणतात.
एका संस्थेतील नोकरीचा ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटी पेमेंटसाठी पात्र ठरतो. बहुतेक कर्मचारी जेव्हा नोकरी बदलतात तेव्हा त्यांना कंपनीकडून ग्रॅच्युइटी मिळेल अशी अपेक्षा असते, पण यासाठी एक ठराविक कालावधी पूर्ण करण्याची गरज आहे.
ग्रॅच्युइटी म्हणजे काय?
सध्या ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला खासगी कंपनी किंवा खासगी संस्थेत किमान पाच वर्षे काम करावे लागते. हा कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्याला निश्चित रक्कम मिळते. ग्रॅच्युइटी हा पेन्शन किंवा भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) भाग नाही.
त्यापेक्षा एकाच ठिकाणी पाच वर्षे सेवा केल्याचा तो पुरस्कार आहे, जो कर्मचाऱ्याला मिळतो. यातील काही भाग कर्मचार्यांच्या पगारातून कापला जातो, परंतु त्यातील बहुतांश रक्कम कंपनीच्या मालकाला द्यावी लागते.
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी नियम
ग्रॅच्युइटीचा नियम "पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972" अंतर्गत करण्यात आला आहे. ज्या कंपन्यांमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना हे लागू आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास किंवा सेवानिवृत्त झाल्यास त्याला उपदानाच्या अटींनुसार लाभ मिळतो.
1972 मध्ये करण्यात आला हा नियम
तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा खाजगी कंपनीचे कर्मचारी, देशातील प्रत्येक नागरिकाला ग्रॅच्युइटीचा समान अधिकार आहे. हा नियम 1972 साली करण्यात आला होता, पण आजही देशातील बहुतांश लोकसंख्येला त्याची माहिती नाही. चला, आज आम्ही तुम्हाला ग्रॅच्युइटीच्या नियमाबद्दल म्हणजे ग्रॅच्युइटीचे सूत्र आणि त्याचे फायदे याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
ग्रॅच्युइटीच्या सूत्रानुसार जर एखादा कर्मचारी ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्याची गणना एक वर्ष म्हणून केली जाईल. म्हणजे जर एखादा कर्मचारी ७ वर्षे आणि ८ महिने काम करत असेल तर ते ८ वर्षे मानले जाईल आणि या आधारावर ग्रॅच्युइटीची रक्कम मोजली जाईल. दुसरीकडे, जर तो ७ वर्षे आणि ३ महिने काम करत असेल तर ते केवळ ७ वर्षे मानले जाईल.
ग्रॅच्युइटीची रक्कम कशी मोजली जाते?
ग्रॅच्युइटीच्या रकमेबद्दल जाणून घेण्यासाठी एक अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. एकूण ग्रॅच्युइटी रक्कम = (शेवटचा पगार) x (१५/२६) x (कंपनीत किती वर्ष काम केले). उदाहरणार्थ एका कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत २० वर्षे काम केले. तर त्या कर्मचाऱ्याचा अंतिम पगार ७५,००० रुपये आहे.
त्यानंतर त्याला सुमारे ८.६५ लाख रुपये ग्रॅच्युईटी (७५०००) x (१५/२६) x (२०) = रु ८६५३८५) मिळतील. लक्षात घ्या की ग्रॅच्युइटीच्या गणनेत, प्रत्येक महिन्यात फक्त २६ दिवस मोजले जातात, कारण चार दिवस सुट्टी मानली जाते. तर ग्रॅच्युइटीची गणना वर्षातील १५ दिवसांच्या आधारे केली जाते.
टॅक्स फ्री ग्रॅज्युइटी
म्हणजेच 12 वर्षं नोकरी केल्यानंतर 4,15,385 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 10 (10) नुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी म्हणून दिल्या जाणाऱ्या 20 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही. सुरुवातीला 10 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त होती.