गुंतवणूकदारांसाठी भारतात उत्तम संधी - निर्मला सीतारामन

वॉशिंग्टन - आयएमएफच्या मुख्यालयात बुधवारी गुंतवणुकदारांशी संवाद साधताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन.
वॉशिंग्टन - आयएमएफच्या मुख्यालयात बुधवारी गुंतवणुकदारांशी संवाद साधताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन.

वॉशिंग्टन - गुंतवणूकदारांना जगात भारतापेक्षा अन्यत्र चांगली संधी मिळू शकणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी व्यक्त केला. भारत हा लोकशाहीप्रेमी आणि भांडवलदारांना आदर देणारा देश आहे, असेही त्या म्हणाल्या.

‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ आणि ‘यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम’ यांच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयातील परिसंवादात सीतारामन बोलत होत्या. भारत सरकार सातत्याने सुधारणा घडवून आणत असल्याची ग्वाही त्यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूदारांसमोर दिली. ‘‘भारताची अर्थव्यवस्था आजही वेगाने वाढणारी आहे. देशात कुशल मनुष्यबळ असून लोकशाही आणि कायदेकानूबरोबरच सुधारणांसाठी आवश्‍यक त्या सर्व गोष्टी सरकार करीत आहे. गुंतणूकदारांनी भारतात निधी का आणावा, या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, की भारतातील न्यायालयीन यंत्रणा थोडीफार वेळखाऊ असली तरी पारदर्शकता आणि खुलेपणा हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.

भारतातील विमा क्षेत्रातील गुंतणुकीसाठी निर्बंध उठविण्याची विनंती काही मुख्य विमा कंपन्यांनी या वेळी केली, त्यावर त्या म्हणाल्या, की या क्षेत्रावरील निर्बंध उठविण्यापेक्षा त्याच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्याची गरज सरकारला वाटत आहे. या विषयावरील माहिती माझ्याकडे पाठवावी. आपण त्याचा खुलेपणाने विचार करू. आता या क्षणाला काहीही आश्‍वासन देऊ शकत नसले तरी यावर निश्‍चित विचार केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com