सेन्सेक्‍समध्ये किरकोळ वाढ 

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी शेअर बाजार स्थिर राहिला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये आज २० अंशांची वाढ होऊन तो ३५ हजार ५५६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० हजार ८०६ अंशांवर स्थिर राहिला. कर्नाटकातील निवडणुकीचा निकाल उद्या (ता.१५) जाहीर होणार आहे. सत्तेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच होईल, असा अंदाज ‘एक्‍झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला.

मुंबई : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी शेअर बाजार स्थिर राहिला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये आज २० अंशांची वाढ होऊन तो ३५ हजार ५५६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० हजार ८०६ अंशांवर स्थिर राहिला. कर्नाटकातील निवडणुकीचा निकाल उद्या (ता.१५) जाहीर होणार आहे. सत्तेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच होईल, असा अंदाज ‘एक्‍झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. दरम्यान, शुक्रवारी (ता.११) देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १ हजार १६३ कोटींचे समभाग खरेदी केले, तर परकी गुंतवणूकदारांनी ३२५ कोटी रुपयांचे समभाग विकले.

Web Title: growth in the Sensex