जीएसटी: घड्याळाची वाईट वेळ सुरू!

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

पुणे: 'एक देश, एक बाजारपेठ, एक कर' हे उद्दिष्ट ठरवून स्वातंत्र्योत्तर काळातील अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या मांडणीतील सर्वांत महत्त्वाचा बदल आजपासून झाला आहे. वस्तू व सेवाकर (जीएसटी) देशभरात लागू झाला आहे. मात्र घड्याळाची वाईट वेळ सुरू झाली आहे. त्यामुळे ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे वापरायची सवय आहे त्यांच्यासाठी वेळ आता महागणार आहे. कारण जीएसटीनंतर हातातील घड्याळ्यावरील कर वाढणार आहे.

हातातील घड्याळ्यावरील कर आधी 20.64 टक्के होता. तो आता 28 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. त्यामुळेच आता वेळ महागणार आहे, असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.

ब्रॅंडेड वस्तू महागणार!

सर्व शेतमाल, अन्नधान्यावर जीएसटी लावला जाणार नाही, हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात बाजारपेठेत 95 टक्के विकल्या जाणाऱ्या ब्रॅंडेड मालाला पाच टक्के कर लागू झाला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये भेसळ होऊ नये म्हणून या संदर्भात कायदा करण्यात आला होता. त्यामुळे या वस्तू पॅकबंद स्वरूपात विकल्या जातात. तरीही त्यावर पाच टक्के कर आकारला जात असल्याने सामान्य माणसाच्या हिताच्याविरुद्ध ही आकारणी ठरावी. ब्रॅंडेड वस्तू आजकाल सर्वच मध्यमवर्गीय घेत असल्याने त्यांना या वाढीव दरामुळे महागाईचा सामना करावा लागणार आहे. साखर, बेदाणे, काजू यावरही पाच टक्के कर बसविला आहे, तर तुपावरील कर पाच टक्‍क्‍यांवरून बारा टक्के केला आहे. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीयांचा दर दिवसाचा खर्चाचा भार वाढेल.

Web Title: GST: bad timing of clock!