‘जीएसटी’ संकलनात डिसेंबरमध्ये घट

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जानेवारी 2019

नवी दिल्ली - वस्तू व सेवाकर (जीएसटी) संकलन डिसेंबर महिन्यात सुमारे ३ हजार कोटींनी घटून ९४ हजार ७२६ कोटी रुपयांवर आले आहे. नोव्हेंबर महिन्यात ते ९७,६३७ कोटी रुपये होते. 

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबरपर्यंत ७२ लाख ४४ हजार जणांनी जीएसटी विवरणपत्रे ’३बी’ भरली. ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात केंद्राकडून राज्यांना ‘जीएसटी’पोटी ११ हजार ९२२ कोटी रुपये अदा करण्यात आले. डिसेंबर महिन्यातील एकूण करसंकलनात सीजीएसटीचा वाटा १६,४४२ कोटी असून, एसजीएसटी व आयजीएसटीच्या माध्यमातून अनुक्रमे २२,४५९ व ४७,९३६ कोटी रुपये जमा झाले. यात उपकरांचा वाटा ७,८८८ कोटी रुपये आहे.

गेल्या महिन्यात केंद्र व राज्यांना सीजीएसटी व एसजीएसटीतून अनुक्रमे ४३,८५१ व ४६,२५२ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GST Collection Decrease