जीएसटी'मधील कर महसुलात घसरण 

जीएसटी'मधील कर महसुलात घसरण 

अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा करापोटी जून महिन्यात केंद्र सरकारला 99 हजार 939 कोटींचा महसूल मिळाला. मे महिन्याच्या तुलनेत यामध्ये घसरण नोंदवण्यात आली. मे महिन्यात जीएसटीमधून 1 लाख 289 कोटींचा महसूल मिळाला होता.

अर्थ खात्याने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात "सीजीएसटी'तून 18 हजार 366 कोटी, "एसजीएसटी'तून 25 हजार 343 कोटी आणि "आयजीएसटी'तून 47 हजार 772 कोटी मिळाले. कर महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारला दरमहा किमान एक लाख कोटींचा जीएसटी महसूल मिळवणे आवश्‍यक आहे. जास्तीत जास्त करदात्यांना "जीएसटी'च्या कक्षेत आणण्याबरोबरच करप्रणाली सुटसुटीत करण्यासाठी जीएसटी काऊन्सिलकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com