जीएसटी संकलनात फेब्रुवारीमध्ये घट

पीटीआय
बुधवार, 28 मार्च 2018

नवी दिल्ली - सलग दुसऱ्या महिन्यामध्ये वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) महसूल घसरला. फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन ८५ हजार १७४ कोटी रुपयांनी घसरले, तर केवळ ६९ टक्के विवरणपत्रे भरण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली. 

फेब्रुवारी महिन्यासाठीची ५९.५१ लाख विवरणपत्रे २५ मार्चपर्यंत जमा करण्यात आली आहेत. यामध्ये ६९ टक्के करदात्यांनी त्यांचे मासिक विवरणपत्र भरले आहे. जीएसटीअंतर्गत फेब्रुवारी २०१८ मध्ये (२६ मार्चपर्यंत) ८५ हजार १७४ कोटी रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. जानेवारीमधील करसंकलन ८६ हजार ३१८ कोटी रुपये होते. 

Web Title: GST compilation decreases in February

टॅग्स