नाटकाच्या अडीचशे रूपयांपर्यंतच्या तिकीटांना जीएसटी नाही

टीम इ सकाळ
मंगळवार, 27 जून 2017

येत्या 1 जुलैपासून लागू होणार्या जीएसटी कराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाट्य निर्माते, सिनेनिर्माते, थिएटर मालक यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री विनाेद तावडे आणि अर्थंमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत 250 रूपयांपर्यंतच्या नाटकांच्या तिकीटांनी जीएसटी लागू नसेल. ही मर्यादा 500 रुपये करावी अशी मागणी निर्मात्यांनी केली. तसा प्रस्ताव कमिटीसमोर मांडण्याची ग्वाही यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली. 

मुंबई: येत्या 1 जुलैपासून लागू होणार्या जीएसटी कराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाट्य निर्माते, सिनेनिर्माते, थिएटर मालक यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री विनाेद तावडे आणि अर्थंमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत 250 रूपयांपर्यंतच्या नाटकांच्या तिकीटांनी जीएसटी लागू नसेल. ही मर्यादा 500 रुपये करावी अशी मागणी निर्मात्यांनी केली. तसा प्रस्ताव कमिटीसमोर मांडण्याची ग्वाही यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली. 

मंगळवारी सकाळी ही बैठक झाली. वैजयंती आपटे यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अशोक हांडे, चंद्रकांक लोकरे, गोपाळ अलगेरी आदी निर्माते हजर होते. कोणत्याही जिवंत कलेशी संबंधीत कार्यक्रमाला 250 रुपयांपर्यंत जीएसटी लागू नसेल अशी माहीती यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली. तर ही मर्यादा वाढवून 500 रूपये करावी अशी मागणी यावेळी निर्मात्यांनी केली. यावर तसा प्रस्ताव तयार करून आपण तो जीएसटी कमिटीकडे पाठवू असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले. मराठीसह गुजराती, हिंदी नाट्यनिर्मातेही यावेळी हजर होते. 

यावेळी सिनेनिर्मात्यांनीही अर्थमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री यांची भेट घेतली. सिनेमावरील 100 रूपयांवरील तिकिटांना 18 टक्के, तर 200 रुपयांवरील तिकीटांना 28 टक्के जीएसटी कर लागणार आहे. मराठी चित्रपटासाठी हा कर रद्द करावा अशी मागणी निर्मात्यांनी केली आहे. तसेच 1994मध्ये झालेल्या करारानुसार सिंगल स्क्रीन थिएटर्सना 100 रूपयांपेक्षा अधिक तिकीट लावता येत नसे. ही अटही रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीलाही मुनगंटीवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. 

Web Title: GST drama cinema esakal news