जीएसटी बैठक: मोदी सरकारकडून लघु उद्योजकांना मोठा दिलासा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जानेवारी 2019

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरुवार) वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची  32 वी बैठक पार पडली. बैठकीत लहान व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. आता वर्षाला 40 लाख रुपयांपर्यंत उलाढाल (टर्नओवर) असणाऱ्या व्यावसायिकांना जीएसटीसाठी नोंदणी करण्यास सूट देण्यात आली आहे. याआधी 20 लाख रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना नोंदणी करणेबाबत सूट देण्यात आली होती. आता ही मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरुवार) वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची  32 वी बैठक पार पडली. बैठकीत लहान व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. आता वर्षाला 40 लाख रुपयांपर्यंत उलाढाल (टर्नओवर) असणाऱ्या व्यावसायिकांना जीएसटीसाठी नोंदणी करण्यास सूट देण्यात आली आहे. याआधी 20 लाख रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना नोंदणी करणेबाबत सूट देण्यात आली होती. आता ही मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात जीएसटीच्या झालेल्या बैठकीत जीएसटी नोंदणी करताना वार्षिक उलाढालीची मर्यादा वाढविण्याबाबत एकमत झाले होते. 

जीएसटी परिषदेने 'कॉम्पोझिशन स्कीम'ची सीमा वाढविण्याची औपचारिक मंजुरी दिली आहे. आता 'कॉम्पोझिशन स्कीम'ची सीमा 1.5 कोटी रुपयांपर्यंत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ती आधी 1 कोटी रुपयांपर्यंत होती. या योजनेतील बदल 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहेत.   
 

Web Title: GST exemption limit doubled to give relief to small businesses