जीएसटी लांबणीवर पडण्याची शक्यता

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

जीएसटीची पुढील दोन दिवसीय बैठक येत्या 22-23 डिसेंबरला पार पडणार आहे. कालच्या बैठकीत चर्चा यशस्वी न झाल्याचे . केरळ आणि तामिळनाडूच्या प्रतिनिधींनी सांगितले. परिणामी चालू वर्षातील जीएसटीची डेडलाइन चुकण्याची शक्यता व्यक्त करत जीएसटी आता सप्टेंबर 2017 मध्ये लागू होण्याची शक्यता वर्तविली आहे

नवी दिल्ली: वस्तू सेवा कर (जीएसटी) आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सरकारने येत्या 1 एप्रिलपासून लागू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र .रविवारी सुरू झालेली दोन दिवसांची जीएसटीची परिषद निष्फळ ठरली आहे. करदात्यांवरील दुहेरी नियंत्रणावर चर्चा न झाल्याने जीएसटीची येत्या 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता कमी झाली आहे.

आता जीएसटीची पुढील दोन दिवसीय बैठक येत्या 22-23 डिसेंबरला पार पडणार आहे. कालच्या बैठकीत चर्चा यशस्वी न झाल्याचे . केरळ आणि तामिळनाडूच्या प्रतिनिधींनी सांगितले. परिणामी चालू वर्षातील जीएसटीची डेडलाइन चुकण्याची शक्यता व्यक्त करत जीएसटी आता सप्टेंबर 2017 मध्ये लागू होण्याची शक्यता वर्तविली आहे.

जेटली यांनी जीएसटी विधेयकातील काही कलम पुन्हा लिहिण्याची गरज व्यक्त केली आहे. सध्या 99 अनुच्छेदांवर चर्चा झाली असून जीएसटी विधेयकाच्या मसुद्यात जवळपास 195 अनुच्छेद आहेत.

Web Title: GST implementation delayed