प्लॅस्टिक उद्योगासाठी ‘जीएसटी’ जाचक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

कर दर निम्म्याने कमी करण्याची प्लास्ट इंडिया फाउंडेशनची मागणी

मुंबई: दैनंदिन वापरातील बहुतांश प्लॅस्टिक वस्तूंवर 24 ते 28 टक्के जीएसटी लावल्याने या उद्योगाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. देशाच्या एकूण उत्पादनात आणि रोजगारनिर्मितीत प्लॅस्टिक उद्योगाचे भरीव योगदान असून दुर्दैवाने प्रस्तावित जीएसटी प्लॅस्टिक उद्योगाला संकटाच्या खाईत नेईल, अशी भीती प्लॅस्टिक उद्योगांची शिखर संघटना प्लास्ट इंडियाने व्यक्त केली आहे. प्रस्तावित 24 टक्‍क्‍यांचा वस्तू व सेवा करात (जीएसटी) 12 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याची मागणी प्लास्ट इंडियाने केली आहे.

प्लॅस्टिक उत्पादने प्रामुख्याने सर्वसामान्य, गरीब व मध्यमवर्गीय यांच्याकडून केला जातो. मात्र बाजारातील बहुतांश प्लॅस्टिक उत्पादनांवर जीएसटी निश्‍चित करताना, जीएसटी परिषदेकडून सारासार विचार झालेला नाही, असे प्लास्ट इंडियाचे म्हणणे आहे. प्लॅस्टिक उत्पादनांचा 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के या करकक्षेत समावेश आहे. करवाढ झाल्याने हजारो लहान व मध्यम प्लॅस्टिक उद्योगांना फटका बसेल; शिवाय गरीब व मध्यमवर्गीयांचेही नुकसान होईल, असे प्लास्ट इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष के. के. सेकसारिया यांनी सांगितले. सध्याच्या अप्रत्यक्ष करांनुसार प्लॅस्टिक उत्पादनांवर उत्पादन शुल्क आकारले जाते, मात्र जीएसटीमुळे किमती वाढतील आणि त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होईल, असे सेकसारिया यांनी सांगितले.

रसायने व खते या मंत्रालयाने प्लॅस्टिक कच्च्या मालावर, यंत्रांवर आणि तयार प्लॅस्टिक उत्पादनांवर 12 टक्के जीएसटी आकारण्याची शिफारस केली आहे. ग्राहक आणि उद्योगांचे हीत जपण्याच्या दृष्टीने आणि सर्वसामान्यांकडून होणारा प्लॅस्टिकचा वापर पाहता जीएसटीचा दर 12 टक्के करण्याची मागणी सेकसारिया यांनी केली आहे.

लघू उद्योजकांना झळ बसणार 
चालू वर्षात प्लॅस्टिक उद्योगाची उलाढाल 7.9 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत प्लॅस्टिक उद्योगाची सरासरी 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. देशात 50 हजार प्लॅस्टिक युनिटपैकी जवळपास 95 टक्के मध्यम व लहान आकाराच्या कंपन्या आहेत. जीएसटीतील 24 टक्के दर या कंपन्यांसाठी मारक ठरेल. त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होईल.

प्लॅस्टिक फर्निचर महागणार 
प्लॅस्टिकचे फर्निचर, तार्पोलिन वोव्हन व नॉन-वोव्हन राफिया फॅब्रिक, प्लॅस्टिकची स्टेशनरी, पीव्हीसी फ्लोअरिंग्स, पीई इंटरलॉकिंग मॅट्‌स, व्हॅक्‍युम फ्लेस्क्‍स व प्लॅस्टिकच्या अन्य वस्तूंचा 28 टक्‍के जीएसटीमध्ये समावेश आहे.

Web Title: GST for the plastic industry