GST : महसूल अधिकाऱ्यांनी पाळला काळा दिवस

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

नवी दिल्ली- भारतीय महसूल सेवेचे (IRS) प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेतील अधिकारी आज (सोमवार) काळा दिवस पाळण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. 

नव्या अप्रत्यक्ष करपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले होते. तथापि, वस्तू व सेवा कर (जीएसटी) मंडळाने केंद्र आणि राज्य प्रशासनाच्या अधिकारक्षेत्रात विभाजन केल्याच्या निर्णयाचा निषेध करीत अधिकाऱ्यांनी काळा दिवस पाळला आहे. 

अधिकारी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करीत आहेत अशी माहिती सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या संघटनेने दिली आहे. जेटली यांच्या आश्वासनानंतर निषेध थांबविणार का याबाबत विचारले असता संघटनेने आपण निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. प्रस्तावित जीएसटी करप्रणालीमध्ये केंद्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारांमध्ये तडजोड करावी लागत आहे अशी भावना संघटनेने बोलून दाखवली. 
 
Web Title: GST protest: Tax officers to wear black bands to work today