‘जीटीपीएल हॅथवे’ला 27 टक्के प्रतिसाद

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

पुणे: जीटीपीएल हॅथवे लि.च्या प्राथमिक समभाग विक्रीला (आयपीओ) आजपासून सुरवात झाली. पहिल्या दिवशी त्याला 27 टक्के प्रतिसाद मिळाला. 23 जूनपर्यंत चालणाऱ्या या समभाग विक्रीसाठी कंपनीने प्रतिशेअर 167 ते 170 रुपयांचा किंमतपट्टा निश्‍चित केला आहे.

प्रस्तावित योजनेत, कंपनी 240 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. याशिवाय "ऑफर फॉर सेल'द्वारे 1.44 कोटी शेअरची विक्री केली जाणार आहे. यापैकी जीटीपीएल हॅथवेची पालक कंपनी हॅथवे केबल अँड डेटाकॉम 72 लाख शेअरची विक्री करणार आहे. "हॅथवे'कडे कंपनीच्या 50 टक्के अर्थात 4.92 कोटी शेअरची मालकी आहे. "आयपीओ'तून मिळणाऱ्या भांडवलाचा उपयोग प्रामुख्याने कर्जाच्या परतफेडीसाठी केला जाणार आहे.

'जीटीपीएल हॅथवे'कडून पुणे, अहमदाबाद आणि कोलकता यासह आणखी अनेक शहरांमध्ये केबल टीव्ही आणि ब्रॉडबॅंड सेवा पुरविल्या जातात. कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात (2015-16) 852.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, 69 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

Web Title: GTPL Hathway IPO sees 27% subscription on Day 1