‘एचडीएफसी एएमसी’च्या शेअरची 1738 रुपयांवर शानदार नोंदणी

वृत्तसंस्था
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुंबई: एचडीएफसी अॅसेट मॅनेटमेंट कंपनीच्या शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात राष्ट्रीय शेअर बाजारात शानदार नोंदणी झाली आहे. शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात  1738 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या रु.1100 या इश्यू प्राइसपेक्षा 58  टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. कंपनीने गुंतवणूकदारांना रु.1100 प्रतिशेअरप्रमाणे शेअर्सचे वाटप केले होते. एचडीएफसी एएमसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला.

सध्या मुंबई शेअर बाजारात एचडीएफसी एएमसीच्याचा शेअर 1804 रुपयांवर व्यवहार करत असून तो 704 रुपयांनी म्हणजेच 64.04 टक्क्यांनी वधारला आहे. सकाळमनीने शेअरची 1500 रुपयांवर नोंदणी होण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली होती. कंपनीने 2,800 कोटी रुपयांचे भांडवल उभारणीचे उद्दिष्ट ठेवले होते. एचडीएफसी एएमसीचा आयपीओ 25 जुलै ते 27 जुलै दरम्यान खुला होता. 

शेअर बाजारातील 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना एका दिवसात कमावून दिले 9 हजार रुपये
आयपीओसाठी अर्ज करताना किमान 13 शेअर्ससाठी अर्ज करणे बंधनकारक होते. त्यामुळे कंपनीने आयपीओसाठी अर्ज करणार्‍या गुंतवणूकदारांना 1100 रुपये प्रतिशेअर प्रमाणे 13 शेअर्स दिले. म्हणजेच 14,300 रुपयात गुंतवणूकदारांना 13 शेअर्स मिळाले. आज शेअर बाजारात शेअरची नोंदणी झाल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना देऊ केलेल्या एका 1100 रुपयांच्या शेअरचा भाव 1800 रुपयांवर पोचला आहे. म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला प्रतिशेअर 700 रुपयांचा फायदा झाला आहे. म्हणजेच एका 13 शेअर्सच्या लॉट मागे एका दिवसात गुंतवणूकदाराला 9100 रुपयांचा फायदा झाला आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HDFC AMC stock debuts at Rs 1,738, a healthy gain of 58% to issue price