एचडीएफसी बँकेची शेअर विभाजनासंबंधी 22 मे रोजी बैठक 

एचडीएफसी बँकेची शेअर विभाजनासंबंधी 22 मे रोजी बैठक 

मुंबई: एचडीएफसी बँक लवकरच शेअर विभाजनाचा निर्णय घेणार आहे. येत्या 22 मे रोजी एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाची शेअर विभाजनासंबंधी बैठक होणार आहे. एचडीएफसी बँकेने  राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, येत्या 22 मे रोजी होणाऱ्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरचे विभाजन एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या दोन शेअरमध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या बँकेच्या शेअरची दर्शनी किंमत दोन रुपये असून त्याचे एक रुपयात रूपांतर करण्यात येणार आहे. 

एचडीएफसी बँकेने जुलै 2011 मध्ये 17 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेने दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे पाच शेअरमध्ये विभाजन केले होते. त्यांनतर शेअरचे दर्शनी मूल्य दोन रुपये करण्यात आले होते. 

बँकेने मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत दमदार कामगिरी करत 5,885.12 कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. गेल्यावर्षी मार्चअखेर एचडीएफसी बॅंकेला 4,799.28 कोटी रुपयांचा नफा झाला होता. विश्लेषकांनी बॅंकेला 5,805 कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यातुलनेत चांगली कामगिरी करत बॅंकेने 5,885.12 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. बॅंकेला निव्वळ व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात 22.8 टक्क्यांची वाढ झाली असून ते उत्पन्न 13,089.50 कोटी रुपयांवर पोचले आहे. 

आज मुंबई शेअर बाजारात एचडीएफसी बँकेचा शेअर नगण्य घसरणीसह 2327.45 रुपयांवर व्यवहार करत बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे 6 लाख 34 हजार 240.40 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com