बॅंकिंग व्यवहार महागले 

पीटीआय
गुरुवार, 2 मार्च 2017

काही बॅंकांकडून भरमसाट व्यवहार शुल्क आकारणीस सुरवात 
नवी दिल्ली, ता. 1 (पीटीआय) : "कॅशलेस' व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅंकिंग व्यवहारांवर जास्तीत जास्त शुल्क आकारणीचा निर्णय बॅंकांनी घेतला आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्‍सिस या बॅंकांनी मार्चपासून व्यवहार शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. ग्राहकांना प्रत्येक पाचव्या व्यवहारांपासून 5 ते 150 रुपयांचे शुल्क आणि इतर अधिभाराचा भुर्दंड सोसावा लागेल. 

काही बॅंकांकडून भरमसाट व्यवहार शुल्क आकारणीस सुरवात 
नवी दिल्ली, ता. 1 (पीटीआय) : "कॅशलेस' व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅंकिंग व्यवहारांवर जास्तीत जास्त शुल्क आकारणीचा निर्णय बॅंकांनी घेतला आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्‍सिस या बॅंकांनी मार्चपासून व्यवहार शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. ग्राहकांना प्रत्येक पाचव्या व्यवहारांपासून 5 ते 150 रुपयांचे शुल्क आणि इतर अधिभाराचा भुर्दंड सोसावा लागेल. 
बॅंक व्यवहारांवरील शुल्क आकारणीने नोटाबंदीतून सावरणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे बचत आणि वेतन खाते असलेल्या ग्राहकांना "डिजिटल' व्यवहारांचा स्वीकार करावा लागणार आहे. "डिजिटल' आणि "कॅशलेस' व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बॅंक व्यवहार शुल्क नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यानुसार एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्‍सिस आदी बॅंकांनी कमाल 150 रुपयांचे व्यवहार शुल्क लागू केले आहे. 
महिनाभरापूर्वी बॅंकेने शुल्कासंबधी ग्राहकांना सूतोवाच केले होते. त्यानुसार 1 मार्चपासून शुल्क आकारणी लागू केल्याचे एचडीएफसी बॅंकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. ग्राहकांना शाखांमधून चार बॅंक व्यवहार (पैसे जमा करणे आणि काढणे) मोफत करता येतील. मूळ शाखेमध्ये दोन लाखांपर्यंत व्यवहार विनाशुल्क करता येतील. मात्र, त्यानंतर प्रत्येक व्यवहारांवर 150 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहेत. बॅंकेने व्यवहार शुल्कात 50 टक्‍क्‍यांची वाढ केली आहे. मात्र, एटीएममधून पाच मोफत व्यवहार कायम असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यापूर्वी बॅंकेकडून सहाव्या व्यवहारावर 100 रुपये शुल्क आकारले जात होते. दरम्यान, एचडीएफसीमध्ये खाते नसलेल्या ग्राहकाला या पुढे बॅंक खातेदारांकडून 25 हजारांहून अधिक रक्कम पाठवता येणार नाही. 
आयसीआयसीआय बॅंकेनेही ग्राहकाला मूळ शाखेतून चार व्यवहार करण्यास मुभा दिली आहे. मात्र, त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 150 रुपये कर भरावा लागेल, असे बॅंकेने म्हटले आहे. ऍक्‍सिस बॅंकेनेही वेतन खाते असलेल्या ग्राहकांना स्थानिक शाखेत 10 रोख व्यवहार किंवा 10 लाख रुपये आणि बचत खातेधारकांसाठी 10 रोख व्यवहार आणि 25 लाख रुपये अशी मोफत व्यवहारांसाठी मर्यादा ठेवली आहे. 10 व्यवहारांपुढील प्रत्येक व्यवहारावर 150 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. 

"एसबीआय'ने मोफत व्यवहार घटवले 
"एसबीआय'च्या ग्राहकांच्या दरमहा मोफत व्यवहारांना कात्री लावली आहे. एप्रिलपासून "एसबीआय'च्या बचत खातेधारकांना महिन्याला केवळ तीनच रोख व्यवहार मोफत करता येतील. त्या पुढील प्रत्येक व्यवहारावर 50 रुपयांचे शुल्क आकारले जाणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. मात्र, यातून ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना वगळण्यात आले आहे. 

बॅंकांचे दरमहा विनाशुल्क व्यवहार 
एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्‍सिस : 4 
स्टेट बॅंक ऑफ इंडिया : 3 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HDFC Bank, ICICI and Axis resume levy on cash transactions