म्युच्युअल फंड युनिट्‌सवर एचडीएफसी बॅंक देणार कर्ज

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - एचडीएफसी बॅंकेने म्युच्युअल फंड युनिट्‌सवर डिजिटल कर्ज देणारी योजना बुधवारी सादर केली. फंड युनिट्‌सवर डिजिटल लोन ही बॅंकिंग व्यवस्थेतील पहिलीच संकल्पना आहे. एचडीएफसी बॅंकेच्या खातेदारांना ही सुविधा मिळणार असून, फंड व्हॅल्यूवर कर्जाची रक्कम ठरवली जाईल. फंड व्यवस्थापनातील ‘सीएएमएस’ या कंपनीशी बॅंकेने भागीदारी केली असून, दहा आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या इक्विटी आणि डेट फंडांवर कर्ज मिळेल.

गेल्या वर्षी बॅंकेने सिक्‍युरिटीजवर कर्ज देणारी योजना आणली होती. आता त्याच धर्तीवर म्युच्युअल फंड युनिट्‌सवरदेखील बॅंक खातेदारांना तात्काळ कर्ज मिळणार आहे. 

Web Title: HDFC Bank to provide loans to mutual fund units