HDFC बँकेकडून मोठी कर्मचारी कपात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

नवी दिल्ली: देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणार्‍या एचडीएफसी बँकेने कर्मचारी कपात केली आहे. सरलेल्या तिमाहीत बँकेने 4,581 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. बँकेच्या उत्पन्नात घसरण झाल्याने आणि वाढत्या खर्चामुळे बँकेने कर्मचारी कपात केली आहे.

पहिल्यांदाच अशा खाजगी क्षेत्रातील बँकेकडून एका तिमाहीत इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात देखील कर्मचारी कपात सुरू राहण्याची शक्यता बँकेकडून वर्तवण्यात आली आहे.

बँकेने नुकतेच आर्थिक निकाल जाहीर केले. एचडीएफसी बँकेने डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत रु.3,865 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात 15 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. अगोदरच्या वर्षातील याच तिमाहीत बँकेला 3,356.84 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

सध्या (12 वाजून 15 मिनिटे) मुंबई शेअर बाजारात एचडीएफसी बँकेचा शेअर 1295.50 रुपयांवर व्यवहार करत असून 7.95 रुपयांनी वधारला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने 928.80 रुपयांची नीचांकी तर 1318.20 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे रु.330,972.06 कोटींचे बाजार भांडवल आहे.

Web Title: hdfc bank reduces workforce