जम्मू-काश्मीरमध्ये 'ही' कंपनी उघडणार पहिली फॅक्ट्री 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नवी दल्लीःजम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले होते. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. त्याला राज्यसभा आणि लोकसभेने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता भारतातील इतर राज्यातील लोक देखील जम्मू आणि काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करू शकणार आहेत. केंद्र सरकारच्या  कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले आहे.

नवी दल्लीःजम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले होते. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. त्याला राज्यसभा आणि लोकसभेने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता भारतातील इतर राज्यातील लोक देखील जम्मू आणि काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करू शकणार आहेत. केंद्र सरकारच्या  कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले आहे. आता आशियातील सर्वात मोठी हेल्मेट कंपनी स्टीलबर्ड हायटेकने जम्मू-काश्मीरमध्ये कारखाना उघडण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. 

स्टीलबर्ड कंपनीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. ''आता काश्मीरमध्ये खऱ्या अर्थाने उद्योग-व्यवसाय सुरु होऊ शकणार आहेत. शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्यास सुरुवात होईल.'' असे स्टीलबर्डकडून सांगण्यात आले आहे. 

सरकारच्या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये कारखाना उघडण्याचा आमचा मानस असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या गुंतवणूक संमेलनमध्ये त्या ठिकाणी कारखाना उभारण्याची योजना बनवणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. विविध राज्यात याप्रमाणेच सुरवात करण्यात आली असून त्यातून प्रगती झाली आहे. आता काश्मीरमध्ये स्थानिक लोकांसाठी खूप मोठी संधी निर्माण होणार असल्याचे कंपनीचे संचालक राजीव कपूर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helmet maker Steelbird offers to set up plant in Jammu & Kashmir