एलआयसीच्या ‘एमडी’पदी हेमंत भार्गव यांची नियुक्ती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) हेमंत भार्गव यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली.

भार्गव हे सध्या एलआयसीचे दिल्लीमध्ये विभागीय व्यवस्थापक आहेत. मंत्रिमंडळाच्या निवड समितीने भार्गव यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून, ही नियुक्ती त्यांच्या निवृत्तीपर्यंत म्हणजेच 31 जुलै 2009 पर्यंत असणार आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने दिली आहे. एलआयसीच्या वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापनात अध्यक्ष आणि तीन व्यवस्थापकीय संचालकांचा समावेश आहे.

Web Title: hemant bhargav appointed md of lic