चलनवाढीचा उच्चांकी दर या वर्षी जानेवारीमध्ये नोंदविला

पीटीआय
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

डिसेंबर महिन्यात किरकोळ चलनवाढ ७.३५ टक्‍क्‍यांवर पोचली होती. मे २०१४ नंतर किरकोळ चलनवाढीचा उच्चांकी दर या वर्षी जानेवारीमध्ये नोंदवण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) वाढून ७.७३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. डिसेंबरमध्ये ग्रामीण भागातील ग्राहक किंमत निर्देशांक ७.२३ टक्के इतका होता.

जानेवारीमध्ये ७.५९ % सहा वर्षांतील उच्चांक
नवी दिल्ली - जानेवारी महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर वाढून ७.५९ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. मागील सहा वर्षांतील ही उच्चांकी पातळी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डिसेंबर महिन्यात किरकोळ चलनवाढ ७.३५ टक्‍क्‍यांवर पोचली होती. मे २०१४ नंतर किरकोळ चलनवाढीचा उच्चांकी दर या वर्षी जानेवारीमध्ये नोंदवण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) वाढून ७.७३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. डिसेंबरमध्ये ग्रामीण भागातील ग्राहक किंमत निर्देशांक ७.२३ टक्के इतका होता. डिसेंबरमध्ये ३.७ टक्के असलेला मुख्य महागाई निर्देशांक जानेवारी महिन्यात ४.८ टक्‍क्‍यांवर पोचला आहे.

रिझर्व्ह बॅंकेने या महिन्यात झालेल्या पतधोरण बैठकीत रेपोदर ५.१५ टक्‍क्‍यांवर कायम ठेवला होता. किरकोळ महागाईचा भडका उडाल्याने अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाही रिझर्व्ह बॅंकेने रेपोदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय किरकोळ चलनवाढीच्या उद्दिष्टातही रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी बदल केले आहेत. आगामी आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बॅंकेने हा दर ५.० टक्के ते ५.४ टक्‍क्‍यांदरम्यान राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरांमध्ये १.३५ टक्‍क्‍यांची कपात केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highest inflation rate was reported in January this year