गुंतवणुकीची संधी: हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा आयपीओ

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबई: हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा (एचएएल) आयपीओ आज (मंगळवार) अखेरच्या दिवशी सकाळी 11.35 वाजेपर्यंत 46 टक्के सबस्क्राइब झाला आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजेच 16 मार्च रोजी खुला झालेल्या आयपीओसाठी अर्ज करण्याचा आज अखरेचा (20 मार्च) दिवस आहे. एचएएल आयपीओच्या माध्यमातून एकूण 3,41,07,525 शेअर्सचो विक्री करणार आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या आयपीओविषयी: 
एचएएलने आयपीओसाठी प्रत्येकी 1,215 रुपये ते 1,240 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. एचएएल सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपन्यांपैकी एक कंपनी असून ती संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करते.

एचएएल सध्या एसयू -30 एमकेआय, हॉक-एजीटी, लाइट कॉम्बॅट विमान (एलसीए), डीओ -228 विमान, ध्रुव-एएलएच आणि चितळ हेलिकॉप्टर, जगुआर, किरण एमकेआई / आयए / II, मिराज, एचएस -748, एएन 32, मिग 21, सु -30 एमकेआय, डीओ -228 विमान आणि एएलएच, चीता / चेतक हेलिकॉप्टर अशा विविध हेलिकॉप्टर आणि एअरक्राफ्टची निर्मिती करते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindustan Aeronautics IPO Subscribed 46% On Third Day