हिंदुस्थान झिंक देणार रु.13,985 कोटींचा विशेष लाभांश

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

नवी दिल्ली: हिंदुस्थान झिंकने आपल्या भागधारकांना पुन्हा एकदा तब्बल 13,985 कोटी रुपयांचा विशेष लाभांश देण्याची घोषणा केली आहे. लाभांशासाठी पात्र गुंतवणूकदारांच्या निवडीसाठी 30 मार्च ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. भागधारकांना प्रतिशेअर 27.50 रुपयांचा लाभांश देण्यात येणार आहे.

याआधी दोन वेळा लाभांश जाहीर करत कंपनीने यावर्षी इतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत भागधारकांना सर्वाधिक लाभांश दिला आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनी भागधारकांना एकुण 27,157 कोटी रुपयांचा लाभांश देणार असून, त्यापैकी केंद्र सरकारला सुमारे 11,259 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे. याआधी गेल्यावर्षी(2016) एप्रिलमध्ये 1200 टक्क्यांचा सुवर्णमहोत्सवी लाभांश आणि ऑक्टोबरमध्ये अंतरिम लाभांश जारी केला होता. प्रवर्तकांची कंपनीत 64.92 टक्के हिस्सेदारी असून केंद्र सरकारची 29.5 टक्के हिस्सेदारी आहे.

सध्या(1 वाजून 5 मिनिटे) मुंबई शेअर बाजारात हिंदुस्थान झिंकचा शेअर 321.80 रुपयांवर व्यवहार करत असून तो 10.05 रुपयांनी म्हणजेच 3.22 टक्क्यांनी वधारला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात रु.135.80 रुपयांची नीचांकी तर 333.40 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.135,907.39 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Hindustan Zinc announces special dividend of Rs 13985 crore