हिंदुस्थान झिंकचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

मुंबई: केंद्र सरकारने 'हिंदुस्थान झिंक'ला 15,000 कोटी रुपयांच्या लाभांशाची मागणी केल्यानंतर कंपनीच्या शेअरने उच्चांकी पातळी गाठली आहे. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या रोख रकमेचा वापर करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी निर्माण झाली आहे.

कंपनीकडे सुमारे 30,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त रोख साठा आहे. मात्र, कंपनीने यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. साधारणपणे महिनाभरापुर्वीच कंपनीला यासंदर्भात सरकारकडून पत्र मिळाल्याचेही सुत्रांनी सांगितले. सरकारची सध्या कंपनीत 29.54 टक्के हिस्सेदारी आहे. मागील आर्थिक वर्षातदेखील कंपनीने सर्व भागधारकांना एकुण 10,141 कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. त्यापैकी सरकारला 3,000 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली होती.

मुंबई शेअर बाजारात आज(बुधवार) कंपनीचा शेअर 290.20 रुपयांवर उघडला. त्यानंतर शेअरने 290.20 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 296.30 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. कंपनीचा शेअर सध्या(12 वाजून 25 मिनिटे) 293.35 रुपयांवर व्यवहार करत असून 3.33 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: hindustan zinc share this week high