Honda ने आणली स्वस्तातील ही नवी बाईक; किंमत फक्त...

वृत्तसंस्था
Tuesday, 2 June 2020

हिरो स्प्लेंडर आयस्मार्ट, हिरो पॅशन प्रो, TVS Radeon, TVS स्टार सिटी प्लस, बजाज CT 110 आणि प्लॅटिना 110 H-Gear या बाईकसोबत टक्कर होणार आहे. 

नवी दिल्ली :  होंडा कंपनीने सर्वात स्वस्तातील बाईक लाँच केली आहे. ही बाईक बीएस 6 मॉडेलची आहे. Honda CD 110 Dream असे लाँच केलेल्या नव्या बाईकचे नाव आहे. ही बाईक दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Honda CD 110 Dream या बाईकमध्ये स्टँडर्ड आणि डिलक्स मॉडेल्समध्ये आहेत. याची किंमतही कमी आहे. त्यामुळे ही बाईक ग्राहकांच्या पसंतीस नक्की उतरेल, अशी कंपनीला आशा आहे. बीएस 6 शिवाय कंपनीने इतर काही नवे फिचर दिले आहेत. 

BS6 Honda CD110 Dream

काय आहेत नवे बदल

बीएस 6 या बाईकमध्ये स्टायलिंग अपडेट करण्यात आला आहे. या बाईकच्या बॉडीवर्कमध्ये थोडा बदल करण्यात आला असून, नवे ग्राफिक्स, क्रोम एग्जॉस्ट शिल्ड, बॉडी कलर मिरर आणि सिल्व्हर फिनिश ऍलोय व्हिल्ज देण्यात आले आहेत. तसेच सीटही 15mm जास्त आरामदायक असे देण्यात आले आहे. 

पॉवर 

Honda CD 110 Dream या बाईकमधील इंजिनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. बाईकमध्ये 109.51cc फ्यूअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. तसेच या बाईकमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. होंडाच्या या बाईकमध्ये इतर बीएस 6 बाईकसारखे सायलंट स्टार्ट फिचर आहे.

इतर फिचर

होंडाच्या सर्वात स्वस्तातील बाईकमध्ये इंजिन स्टार्ट/ स्टॉप, हेडलँप, इंटिग्रेटेड हेडलँप बीम एंड पासिंग स्विच, ट्युबलेस टायर, आरामदायक सीट हे सर्व फिचर देण्यात आले आहेत. 

Honda CD 110 Dream

ब्रेक्स आणि कलर

Honda CD 110 Dream या बाईकमध्ये फ्रंट आणि रिअरमध्ये 130mm ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. ही बाईक आठ कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये 4 कलर स्टँडर्ड वेरियंट आणि 4 कलर ऑप्शन डिलक्स वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. स्टँडर्ड वेरिएंटमध्ये बाईक ब्लू कलरसह ब्लॅक, रेड, ग्रे उपलब्ध आहे. तर डिलक्स वेरिएंटमध्ये ब्लँक, एथलेटिक ब्लू मेटेलिक आणि इम्पिरिएर रेड या कलरमध्ये उपलब्ध आहेत. 

किंमत

Honda CD 110 Dream दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. स्टँडर्ड मॉडेलची बाईक 64,505 तर डिलक्स मॉडेलची बाईक 65,505 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 

Honda CD 110 Dream BS6

या बाईकशी होणार टक्कर

हिरो स्प्लेंडर आयस्मार्ट, हिरो पॅशन प्रो, TVS Radeon, TVS स्टार सिटी प्लस, बजाज CT 110 आणि प्लॅटिना 110 H-Gear या बाईकसोबत टक्कर होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Honda Cd 110 Dream BS6 Launched Price Features And Specifications Details

Tags
टॉपिकस
Topic Tags: