esakal | जेटली आणि पत्रकारांचे नाते 'असे' होते... 
sakal

बोलून बातमी शोधा

जेटली आणि पत्रकारांचे नाते 'असे' होते... 

जेटलींचे पत्रकारांशी खास नाते होते. शिवाय भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळे पत्रकारांचे देखील ते एक लाडके नेते होते

जेटली आणि पत्रकारांचे नाते 'असे' होते... 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

 नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ञ आणि संसदेपासून सडके पर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (67 ) यांचे आज दुपारी पाऊणच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 

जेटलींचे पत्रकारांशी खास नाते होते. शिवाय भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळे पत्रकारांचे देखील ते एक लाडके नेते होते. इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व असलेले जेटली हे जटील कायदेशीर मुद्यांवर तत्काळ व वस्तुनिष्ठ मतप्रदर्शन करण्यासाठी व शाब्दीक कोट्या करून संसदेत विरोधकांना नामोहरम करण्यासाठी प्रसिध्द होते. राज्यसभेत तर भाजपसाठी जेटली यांचे केवळ असणे म्हणजे फार मोठा ाधार असे. 2009 ते 2014 या काळात विरोधी पक्षनेते व 2014 -19 या काळात राज्यसभेतील सभागृहनेते म्हणून जेटली यांनी अत्यंत प्रबावी कामगिरी बजावली.

प्रसारमाध्यमांशी विशेषतः इंग्रजी माध्यमांशी त्यांचे विशेष सख्य होते. त्यांच्या अशोका रस्त्यावरील निवासस्थानी किंवा त्यांची प्रकृती ठीक असेपर्यंत संसदेतील त्यांच्या दालनातही विविध भाषिक पत्रकारांचा दरबार नियमित भरत असे. यावेळी सूचक "बातम्या' तर मिळतच पण हास्यविनोदाला बहर येई. जेटली यांच्या निधनाने तो दरबार आता पुन्हा भरणार नाही या जाणिवेने पत्रकारांमध्येही अस्वस्थता आहे. 

loading image
go to top