प्राप्तिकर विवरणपत्राचा सोपा व सुटसुटीत अर्ज

पीटीआय
गुरुवार, 30 मार्च 2017

नवी दिल्ली : पगारदार कर्मचाऱ्यांसाठी प्राप्तिकर विवरणपत्राचा सोपा, सुटसुटीतपणा अर्ज येत्या एक एप्रिलपासून उपलब्ध केला जाणार आहे.
पगार व व्याजाचे उत्पन्न असणाऱ्या वैयक्तिक करदात्यांना नव्या आर्थिक वर्षात विवरणपत्र भरणे अधिक सुलभ होणार आहे. या करदात्यांना पूर्वीच्या अर्जाच्या तुलनेत कमी रकाने भरावे लागणार आहेत.

2017-18 या आकारणी वर्षासाठीच्या नव्या अर्जात कलम 6ए अंतर्गत मागितल्या जाणाऱ्या विविध वजावटींचे रकाने वगळण्यात आले असून, फक्त सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कलमांच्या रकान्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये करबचतीच्या गुंतवणुकीचे लोकप्रिय कलम 80सी, मेडिक्‍लेमसंदर्भातील कलम 80डी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अन्य कलमांखाली कर वजावट घेण्याची इच्छा असणाऱ्या वैयक्तिक करदात्यांना योग्य तो पर्याय निवडून तसे करता येऊ शकेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाधिक नागरिकांनी विवरणपत्र भरावे, या हेतूने हे अर्ज सोपे व सुटसुटीत करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. देशातील 29 कोटी लोकांकडे कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) असून, त्यापैकी फक्त सहा कोटी नागरिक सध्या प्राप्तिकर विवरणपत्र भरतात.
विवरणपत्राचे नवे अर्ज करदात्यांसाठी लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सध्याच्या आयटीआर 1 किंवा "सहज' या विवरणपत्रात कलम 80सी अंतर्गत वजावट मागण्यासाठी 18 विविध रकाने आहेत. या कलमांतर्गत एलआयसी, पीपीएफ, एनएससी, ईएलएसएस, गृहकर्जाच्या मुद्दलाची परतफेड आदी गुंतवणुकीच्या माध्यमातून एकूण दीड लाख रुपयांची वजावट एकूण उत्पन्नातून मागता येते. कलम 80डी अंतर्गत वैद्यकीय विम्यासाठी भरलेल्या हप्त्याची वजावट एकूण उत्पन्नातून घेता येऊ शकते.

Web Title: how to fill income tax form