गृहकर्ज कसे मिळवावे; 'या' आहेत खास टिप्स 

गृहकर्ज कसे मिळवावे; 'या' आहेत खास टिप्स 

- पतमानांकन तपासा ः कमी दराने गृहकर्ज मिळविण्यासाठी तुमचे पतमानांकन (क्रेडिट रेटिंग) तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगले पतमानांकन नसेल तर "प्रीमियम' भरावा लागतो. त्यामुळे चांगले पतनामांकन राखणे गरजेचे आहे. 


- घर घेण्यापूर्वीच गृहकर्जाची मंजुरी मिळवा ः घरखरेदीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ग्राहकाने आपले "बजेट' तपासावे. आपल्याला किती गृहकर्ज मिळू शकेल; तसेच किती "डाऊनपेमेंट' करावे लागेल, याचा अंदाज घ्यावा. 


- "डाऊनपेमेंट' किती असावे? ः घरखरेदी करताना ग्राहकाने सर्वसाधारणपणे 10 ते 25 टक्के एवढ्या "डाऊनपेमेंट'व्यतिरिक्त इतर खर्चाचाही विचार करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे स्टॅंप ड्यूटी, क्‍लब शुल्क, विकास शुल्क, इन्शुरन्स खर्च, सोसायटी डिपॉझिट आधी गोष्टींसाठी कर्ज मिळत नाही. त्यामुळे कोणत्या गोष्टींसाठी कर्ज मिळते आणि कशासाठी मिळत नाही, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. 


- तरल (फ्लोटिंग) व्याजदर : सर्वसाधारणपणे गृहकर्जदार हा आपल्या कर्जाच्या परतफेडीसाठी 20 ते 30 वर्षांचा कालावधी निवडतो. तरल दरांमध्ये वेगवेगळ्या बदलत्या व्याजदरांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध असतात. त्यामध्ये वार्षिक, तिमाही आणि मासिक पर्यायांचाही समावेश असतो. 


- "डेली रिड्युसिंग'चा फायदा ः दररोज कर्जाचा आकडा कमी होईल अशापद्धतीच्या व्याजदराचा (डेली रिड्युसिंग) पर्याय निवडता येतो. जर समजा एखाद्या ग्राहकाचा गृहकर्ज हप्त्याची तारीख 25 असेल आणि त्याने समजा त्याच महिन्याच्या 5 तारखेला आपला गृहकर्ज हप्ता जमा केला असेल तर ग्राहकाचे उरलेल्या 20 दिवसांवरील व्याज देणे वाचते. 


- गृहकर्जाचा विमा ः गृहकर्जाची रक्कम साधारणपणे मोठी असते. सर्वसाधारणे वार्षिक उत्पन्नाच्या 5 ते 6 पट गृहकर्ज घेतले जाते. अशा मोठ्या गृहकर्ज रकमेसाठी विम्याचे पाठबळ घेणे गरजेचे असते. तसे पाठबळ घेतल्यास एखादी दुर्घटना घडली तरी त्याचा फटका गृहकर्जदाराच्या कुटुंबीयांस बसत नाही. 


- गृहखरेदी करण्यापूर्वी कर्ज नको ः काही जण "डाऊनपेमेंट'साठीही कमी कालावधीचे वेगळे वैयक्तिक कर्ज काढतात. या कर्जाचा व्याजदर चढा असल्यामुळे बऱ्याच वेळी केवळ या कारणापायी ग्राहकाला गृहकर्ज नाकारले जाते. त्यामुळे गृहखरेदीपूर्वी वेगळे कर्ज काढून नये. 

(लेखक बॅंक ऑफ बडोदाच्या मॉर्गेजेस आणि इतर रिटेल ऍसेट्‌स विभागाचे प्रमुख आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com