तुमची मासिक बचत बजाज फायनान्स एफडीसोबत कशी वाढवावी?

टीम ई-सकाळ
बुधवार, 29 जानेवारी 2020

तुमच्या वेतनाचा उपयोग या गुंतवणूक साधनाकरिता जास्तीत जास्त कसा करता येईल, हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. तुम्हाला एफडी सुरू करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यकता नाही.

वर्षाचा पहिला महिना संपत येताना, या वर्षातील पहिल्या वेतनाची उत्सुकता तुमच्या डोक्यात असेल. यावर्षापासून ज्यांनी बचतीचा निश्चय केला आहे, त्यांच्यासाठी स्वत:ला दिलेले वचन पूर्ण करण्याच्या दृष्टीने याहून चांगली वेळ असूच शकत नाही. तसेच विनयशील मुदत ठेवीहून चांगला पर्याय असू शकत नाही.

तुमच्या वेतनाचा एक भाग बाजूला ठेवून, fixed deposit मध्ये गुंतवणूक करून त्याचे मूल्य वाढवता येते. जेणेकरून तुम्हाला तुमची दीर्घकालीन उद्दिष्टे गाठायला मदत होते. याविषयी तुम्हाला बचत खात्याची मदत होऊ शकते, मात्र हा पर्याय तुम्हाला आकर्षक व्याज दर देऊ शकत नाही. दुसरीकडे, बॉन्ड आणि थेट इक्विटीसारख्या साधनांमध्ये महत्त्वाची जोखीम सामावलेली असते. त्यामुळे आपली साठवलेली रक्कम उदार व्याज दराच्या किंमतीत खात्रीशीर परतावा मिळवून देणारी ठरते.त्यामुळे बजाज फायनान्स एफडीसारखा पर्याय सर्वोत्तम ठरतो.

तुमच्या वेतनाचा उपयोग या गुंतवणूक साधनाकरिता जास्तीत जास्त कसा करता येईल, हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. तुम्हाला एफडी सुरू करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यकता नाही. सिस्टीमॅटीक डिपॉझीट प्लान वैशिष्ट्यासमवेत बजाज फायनान्स एफडी तुम्हाला दर महिन्याला रु. 5,000 गुंतवण्याची संधी     देते. याचा अर्थ तुम्ही तुमच्या वेतनातील लहान भाग दर महिन्याला बाजूला ठेवू शकता व तुमच्या प्रत्येक वेतनावर अतिरिक्त रक्कम कमावण्याची संधी मिळते. या अभिनव, अशाप्रकारचे एकमेव एफडी वैशिष्ट्यामार्फत तुम्ही वेतनात कशाप्रकारे भर घालू शकता याविषयी खालील माहिती वाचावी.

दर महिन्याला केवळ रु. 5,000 ने बचतीची सुरुवात करा
जाज फायनान्सच्या वतीने देऊ करण्यात येणारा सिस्टीमॅटीक डिपॉझीट प्लान (एसडीपी) तुम्हाला लागलीच बचत करण्यास उद्युक्त करतो. ज्यामुळे एक ठरावीक रक्कम जमा होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागत नाही. तुमच्या कमवण्याच्या क्षमतेनुसार तसेच तुमच्यावर असणाऱ्या आर्थिक जबाबदारीनुरूप रु. 5000 किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम तुम्ही बचतीत टाकू शकता. जर तुम्ही नियमित नागरिक आहात तर तुम्हाला 8.10% दराने परतावा मिळेल किंवा जर वरिष्ठ नागरिक असल्यास 8.35% दर लागू असेल. तुम्हाला 6 ते 48 वेळा रक्कम जमा करता येईल. त्यामुळे थेंबे-थेंबे बचतीची गंगाजळी एकावेळी घेतलेल्या निर्णयामुळे जमा होईल.

तुमचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जमा रकमेकरिता साजेसा कालावधी निवडा
जेव्हा तुम्ही Systematic Deposit Plan च्या मदतीने बचत करण्याचे निश्चित करता, तेव्हा तुमचे रक्कम जमा करण्याच्या उद्देशाने उचललेले पहिले पाऊल वेगळ्या निधीचा संग्रह करतो. त्याशिवाय, रक्कम कधी जमा करायची याबाबत निर्णय तुम्ही स्वत: घेऊ शकता. याचा अर्थ रक्कम जमा करण्याची तारीख दर महिन्याला 3, 7 किंवा 12 असू शकते. त्यामुळे तुमच्या बचतीत लवचिकता राहते व वेळोवेळी तुमच्या उद्दिष्टांकरिता रोखप्रवाह राहतो. एकदा का तुम्ही साजेशी तारीख आणि कालावधी निश्चित केला की, सर्वप्रकारच्या डिपॉझीटकरिता तारीख आणि कालावधी एकसमान राहतो.

खाली दिलेल्या तक्त्यात, असे समजूया की एखाद्या नवीन ग्राहकाने 12 महिन्यांसाठी मासिक रु. 5000 ची  रक्कम जमा करण्याचे निश्चित केले. तर मग निरनिराळ्या कालावधीकरिता तुम्ही तुमची बचत रक्कम कशाप्रकारे वाढवू शकता, त्याकरिता खालील तक्ता पहा.

Image may contain: possible text that says 'कालावधी (महिन्यांमध्ये) व्याज दर (% मध्ये) प्रत्येक जमा रकमेवरील व्याजाची रक्कम (रुपयांमध्ये) 12 दर महिन्याचा पेआऊट (रुपयांमध्ये) 24 एकूण पेआऊट (रुपयांमध्ये) 380 7.6 7.9 7.9 8.1 36 कमावलेले व्याज (रुपयांमध्ये) 821 5,380 1,316 5,821 64,560 69, 69,852 4,560 6,316 75,792 9,8 9,852 15,792'

त्यामुळे 12 महिने मासिक रु. 5000 जमा करून तुम्ही रु. 60,000 जमा करू शकता, जी रक्कम ठरवलेल्या कालावधीनुसार वाढेल. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही 12 महिन्यांच्या कालावधीची निवड करता. तेव्हा तुम्हाला रु. 64,560 चा पेआऊट मिळतो. तसेच 24 महिन्यांचा कालावधी निवडल्यास रु. 69,852 मिळू शकतात. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 36 महिन्यांचा कालावधी निवडला, तर तुम्ही जमा केलेली रु 60000 ची रक्कम वाढून रु. 75,792 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे, हा मासिक बचतीचा पर्याय तुमचे नवीन वर्षाचा निश्चय करण्याच्या दृष्टीने एक स्मार्ट निवड ठरते. जेणेकरून तुमची बचत शिस्तशीर पद्धतीने वाढायला साह्य मिळते.

सुलभ आणि गुंतागुंत-मुक्त पद्धतीने बचत करा

सिस्टीमॅटीक डिपॉझीट प्लानसोबत तुम्हाला कोणत्याही जोखिमीशिवाय एसआयपी’ची सुलभता मिळू शकते. इथे तुमचा सुरुवातीचा भरणा धनादेशाद्वारे करणे आवश्यक ठरते, ज्यामुळे तुमच्या बँक खात्याची नोंदणी होते. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की त्यापुढची जमा सुलभतेने करणे शक्य होते. बजाज फायनान्स लिमिटेडच्या नावे एनएसीएच हुकुम जारी केला जातो. याचा अर्थ एकदा का हुकुम जारी झाला की दर महिन्याला रक्कम तुमच्या खात्यातून स्वयंचलित पद्धतीने डेबिट केली जाते.

कालावधी परिपक्व होण्याआधी रक्कम काढून घेणे किंवा मुदतीच्या रकमेवर त्वरीत कर्ज मिळवणे
तुम्हाला एखाद्या आपतकालीन स्थितीत तातडीने पैशाची निकड भासल्यास, तुम्ही एफडी भरण्यास सुरुवात केल्यावर 3 महिन्यांनी एफडीतून बचतीची रक्कम काढू शकता. ज्यावेळी ही रक्कम खात्यातून काढाल, त्यावेळी असलेल्या आरबीआय तरतुदी त्या व्यवहाराला लागू होतील. त्याशिवाय, तुम्ही तुमच्या आर्थिक गरजेकरिता एफडीवर कर्ज देखील घेऊ शकता. सिस्टीमॅटीक डिपॉझीट प्लानसोबतची बचत तुमची संपत्ती वाढवायला साह्य तर करेलच, शिवाय तुम्हाला कोणती जोखीमही असणार नाही. बजाज फायनान्स एफडी हा तुमच्या दृष्टीने एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरतो. ज्याला क्रिसीलचे एफएएए सर्वोच्च रेटींग व आयसीआरएकडून एमएएए रेटींग प्राप्त आहे. हा तुमचा पैसा सुरक्षित असल्याकडे अंगुलीनिर्देश करतो. तर मग वाट कसली पाहताय?Bajaj Finance online FDमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा आणि प्रत्येक बचतीतून कमाईचा मार्ग खुला करून द्या. जर तुम्हाला लहानशी मासिक बचत करायची असेल तर तुम्ही apply for Systematic Deposit Planची निवडही करू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to grow your monthly savings with bajaj finance fixed deposit