रोकड टंचाईमुळे रिअल इस्टेट सेक्टर संकटात

रोकड टंचाईमुळे रिअल इस्टेट सेक्टर संकटात

मुंबई: बिगर बॅंकिंग वित्त सेवा क्षेत्राला (एनबीएफसी) समस्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे "एनबीएफसी" कंपन्या आणि हौसिंग फायनान्स कंपन्यांनी स्थावर मालमत्ता क्षेत्राला पत पुरवठा करताना हात आखडता घेतला असल्याचे "फिच रेटिंग्ज" या संस्थेने म्हटले आहे. मात्र एनबीएफसी कंपन्यांच्या या पवित्र्यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रात रोकड टंचाईची जोखीम वाढल्याचा इशारा "फिच"ने दिला आहे. 

एनबीएफसी कंपन्यांवर पत पुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या विकासकांची रोकड टंचाईने कोंडी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदीशी झगडणाऱ्या स्थावर मालमत्ता क्षेत्रामध्ये बिगर बॅंकिंग वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला आहे. बॅंकांनी कठोर नियमावली केल्याने "एनबीएफसी" कंपन्यांनी जोखीम पत्कारत या क्षेत्रात पत पुरवठा केला. मात्र आता या कंपन्या अडचणीत सापडल्या असल्याचे "फिच"ने म्हटले आहे. विकासकांकडे घरांचा प्रचंड शिल्लक साठा आहेत. रखडलेल्या महागड्या प्रकल्पांची निधी अभावी कोंडी झाली असून विक्री ठप्प असल्याने विकासकांना निधी व्यवस्थापनात संघर्ष करावा लागत आहे. 
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयएल अँड एफएस आणि जून महिन्यात दिवाण हौसिंग फायनान्स या दोन कंपन्या आर्थिक संकटात सापडल्यानंतर "एनबीएफसी" क्षेत्राला झटका बसला आहे. यामुळे गुंतवणूकदार नव्याने एनबीएफसी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नसल्याचे "फिच"ने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com