जिओ फायबरसाठी नोंदणी करायची आहे? मग 'इथे' करा

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

रिलायन्स जिओने आज ‘जिओ फायबर’ची घोषणा केली आहे.

मुंबई: रिलायन्स जिओने आज (सोमवार)  ‘जिओ फायबर’ची घोषणा केली आहे. आता ग्राहकांना  ब्रॉडबँड सेवा पुरवण्यात येणार आहे. येत्या पाच सप्टेंबर रोजी जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर सेवेचेकमर्शिअल लाँचिंग करण्यात येणार आहे. ग्राहकांना 100 एमबीपीएस ते एक जीबीपीएस इतका  इंटरनेट स्पीड मिळणार आहे. 

इथे करा नोंदणी 
– जिओ फायबरच्या नोंदणीसाठी https://gigafiber.jio.com/registration

– या लिंकवर जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणाची माहिती भरा

योजना काय आहेत? 
जिओ फक्त 700 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंतच्या दरात ही सेवा देणार आहे
जिओ फायबर घर, कार्यालय, लहान मोठे उद्योजक तसेच कंपन्यांना हायस्पीड इंटरनेट कनेक्शन देणार आहे
जिओ फायबर जोडणीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु झाली आहे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to register FOR jio gigafiber